I am trying (to understand). In the process, I hope to share my experiences on this platform... When I write, I need to self-talk, read, re-read, (re-write)... Then I find gaps, my mis-understandings, errors both in my writing as well as in behavior. And I get lessons on what I need to learn/improve. Then I try. I fail. I re-try. I fail. Did I? No, because I tried again. This is my way of life to lead myself: Personally and Professionally. Checkout my other blogs and work at http://www.worldOFkaizen.com/

Friday 15 May 2020

करोना-करोना-करोना किती

करोना-करोना-करोना किती
(करोना-करोना-करोना किती
आता झाले बाई अ~~ति~~~)²
(कुंठून गेली माझी मति)²
भय वाटे विचारांती
करोना-करोना-करोना किती....

प्रथम चरणी,
(प्रथम चरणी, वाटले मज)²
वेळच-वेळ बहु किती
(कामे पेंडींग घेता हाती)²
नाकी रे नऊ येती
करोना-करोना-करोना किती....

जाऊन आणली 
(जाऊन आणली, खताणी माती)²
"लाऊ गं झाडं किती"
(पुसता-क्षणी येती हाती)²
"कुटा या कांद्याच्या पाती"
करोना-करोना-करोना किती....

वाचू म्हटले
(वाचू म्हटले, ज्ञानात भर)²
घेतले पुस्तक हाती
"(विसरले का ओ नाती-गोती)²
हा घ्या सेलफोन सांगाती"
करोना-करोना-करोना किती....

पाहू म्हटले
(पाहू म्हटले, जरा टीव्ही)²
घेतला रिमोट हाती
("चला उठा, हे घ्या ओ")²
आला झाडू-पोच्छा हाती
करोना-करोना-करोना किती....

आवर घातला 
(आवर घातला, माझ्या मनी)²
घे ना रे 'छंदा' हाती
(विसरू नको, रे गड्या तू)²
"तू-च तुझा सांगाती"
करोना-करोना-करोना किती....


(* "कठीण-कठीण-कठीण किती" Kathin_Kathin_Kiti या मराठी गाण्याच्या (Marathi song) चालीवर वाचल्यास उत्तम)